top of page
Writer's pictureMahannewsonline

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सहा वाहनांचा भीषण अपघात; चौघे जागीच ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ हा बोरघाटात आज सकाळी एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहने एकमेकांना धडकली. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

गौरव खरात (वय-३६), सौरभ तुळसे (वय-३२), सिद्धार्थ राजगुरू वय-३१, सर्व रा. सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाचे नाव समजू शकले नाही घटनेची माहिती मिळताच येथे महाराष्ट्र सुरक्षा दल, देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलिस दाखल झाले. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.



bottom of page