top of page

दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत

पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिलजवळ पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. दरड बाजुला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच विस्कळीत झालेली पुणे-मुंबई रेल्वे सेवा सुरळीत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.



bottom of page