top of page
Writer's pictureMahannewsonline

“मुंबई संस्कृती” संगीत महोत्सव २०२२ चे आभासी (virtual) आयोजन

मुंबई : इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई (IHS) तर्फे व महाराष्ट्र पर्यटन आणि पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने 30 व्या “मुंबई संस्कृती” संगीत महोत्सवाचे आभासी (virtual) आयोजन शास्त्रीय संगीत रसिकांसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या कन्व्होकेशन हॉल (convocation hall) येथे करण्यात आले.

या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामांकित कलाकार कला सादर करतात. कार्यक्रमाचे आभासी सादरीकरण YouTube च्या माध्यमांद्वारे (www.youtube.com/IndianHeritageSocietyMumbai/) खालील नमूद तारखांनुसार करण्यात येणार असून रसिक प्रेक्षकांना त्याचा विनामूल्य आस्वाद घेता येईल. १) शुक्रवार- ११ फेब्रुवारी २०२२– पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी वादन) २) शुक्रवार-१८ फेब्रुवारी २०२२– संजीव चिमलगी (शास्त्रीय गायन) ३) शुक्रवार – २५ फेब्रुवारी २०२२ – अंकिता जोशी (शास्त्रीय गायन) ४) शुक्रवार४ मार्च २०२२ – पद्मभूषण एन. राजम (व्हायोलिन वादन).


मुंबईतील अनेक नाविन्यपूर्ण, ऐतिहासिक वारसा स्थळांचा शोध आणि त्यांचे संवर्धन करणे हे इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई (IHS) चे मुख्य उद्दिष्ट आहे . )दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव प्रथमतः सुशोभिकरण व संवर्धन करण्याची मोठी कामगिरी इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई या सेवाभावी संस्थतर्फे करण्यात आली. तसेच या ठिकाणाचा पर्यटनदृष्ट्या प्रचार करण्यासाठी इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई ही 1992 पासून “Live Music To Save Heritage” या संकल्पनेवर आधारित शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन बाणगंगा तलावाकाठी करीत असे. तथापि 2008 पासून ध्वनिप्रदूषणाच्या कारणास्तव व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महोत्सवाचे ठिकाण बदलून एशियाटिक लायब्ररी (Town Hall) येथे करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील अजून एका ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या वास्तूची ओळख इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबईतर्फे नवीन पिढीला करून देण्यात आली. आता हा महोत्सव संगीत रसिकांसाठी बाणगंगा महोत्सव ऐवजी मुंबई संस्कृती या नावाने आयोजित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर्षी देखील “मुंबई संस्कृती” महोत्सवाचे आभासी (virtual) आयोजन मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या काँव्होकेशन हॉल (convocation hall) मध्ये करण्यात आले आहे

या महोत्सवाबद्दल सांगताना इंडियन हेरिटेज सोसायटी-मुंबईच्या अध्यक्षा अनिता गरवारे म्हणाल्या, संस्कृती आणि संगीत परंपरेचा अद्वितीय वारसा हीच आपली ओळख आहे. यासाठीच आम्ही हा कार्यक्रम वारसा स्थळी आयोजित करतो. जेणेकरून महोत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सांगीतिक वारसा आपण जतन आणि वृद्धिंगतही करू शकतो.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक Tata Consultancy Services, सह प्रायोजक HSBC हे असून रेडीओ पार्टनर FM Radio City हे आहेत. तसेच कार्यक्रमाचे संयोजन हे नॉर्थन लाइट्स (NorthernLights) यांच्याद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबईच्या फेसबुक व इंस्टाग्रामवर फॉलो करा. (Ph. 9920622480) /ihsmumbai @ihsmumbai www.ihsmumbai.com असे कळविण्यात आले आहे.

bottom of page