top of page
Writer's pictureMahannewsonline

१६ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; डोळे बाहेर काढून झाडाला लटकवला मृतदेह

एका १६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. ती दहावीच्या वर्गात होती. मुलीची हत्या करून झाडाला लटकवण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी प्रदीप कुमार सिंह धुनक ( २३ वर्ष) याला अटक केली आहे. त्याच्यासोबत इतरही काहीजण सहभागी असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

७ जून रोजी सकाळी १० वाजता घर सोडल्यानंतर मुलगी बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबाने मंगळवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांकडून शोध सुरु असताना गावकऱ्यांना जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह आढळून आला. हत्या करण्यापूर्वी पीडितेला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर आत्महत्या दर्शवण्यासाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान पीडितेच्या कुटुंबाने आरोपींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर याबाबत स्पष्ट माहिती मिळेल असं सांगितलं असून आपण सर्व बाजूंनी तपास करत असल्याचं सांगितलं आहे.


bottom of page