top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : अपघात की हत्या ? न्यायाधीशांच्या मृत्यूनंतर CCTV फुटेज आलं समोर

मॉर्निंग वॉकला गेलेले जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद यांचा एका दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा अपघात होता की हत्या? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ज्या गाडीच्या धडकेमध्ये आनंद यांचा मृत्यू झाला त्या गाडीने मुद्दाम त्यांना धडक दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनबाद येथील जिल्हा तसेच सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम आनंद हे बुधवारी सकाळी वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर आनंद हे बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या सर्व अपघाताचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये केद झाला आहे. या सीसीटीव्हीमध्ये आनंद हे रस्त्याच्या कडेने धावताना दिसत आहेत तर त्याच रस्त्यावरुन एक मोठ्या आकाराची रिक्षा (टमटम रिक्षा) रस्त्यावरुन सरळ जात असताना दिसते. मात्र अचानक ही रिक्षा रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या आनंद यांना धडक देऊन निघून जाते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जाणूनबुजून या रिक्षाने आनंद यांना धक्का दिला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, न्यायाधीशांच्या या संक्षयास्पद अपघातामधील रिक्षा ही चोरीची असल्याचे उघडकीस आले आहे. माजी आमदाराच्या मर्जीतील व्यक्ती असणाऱ्या रंजय हत्याकांडसारख्या प्रकरणाबरोबरच अनेक महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या आनंद यांची हत्या करण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पोलिसांनीही ही शक्यता पडताळून पाहण्याच्या दृष्टीने तपास सुरु असून या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करावी अशी मागणी माजी आमदाराने केली आहे.


bottom of page