top of page
Writer's pictureMahannewsonline

आता mYoga अ‍ॅपद्वारे जगाला मिळणार योगाचे धडे

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं देशवासियांना संबोधित

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी करोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योग दिनी पंतप्रधान मोदींनी वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा देत M - Yoga अ‍ॅप लाँच केल्याची घोषणा केली. या अ‍ॅपच्या माध्यामातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून M-Yoga App तयार केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना म्हटलं की, जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा त्यामागे संपूर्ण जगाला योगा सहजपणे माहिती व्हावा हीच भावना होती. या अ‍ॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील असंही मोदींनी म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबत मिळून एक महत्त्वाचं पाऊल उचललं असल्याचं प्रतिपादन मोदींनी केलं.

हे अ‍ॅप फ्रेंच, इंग्लिश, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषेमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. अ‍ॅप सुरक्षित असून युजरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. 12 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या अ‍ॅपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात असंही WHO ने म्हटलं आहे.

यंदाच्या योग दिनाची थीम ही योगा फॉर वेलनेस आहे. योगदिनाच्या शुभेच्छा देताना मोदींनी ट्विटरवर म्हटलं की, 'योगा फॉर वेलनेस' योगामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आजार असेल तर तो शोधा, त्याच्या मुळापर्यंत जा आणि त्याचा उपचार निश्चित करा असं महात्म्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या या संकटात योगाचा इम्युनिटीवर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर संशोधन सुरु आहे. अनेक कोरोना रुग्णांनी योगा केला. कोरोना काळात योग करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी सांगितलं.


bottom of page