top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रियकराला मारहाण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार

म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूर इथं एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरा बाहेर असलेल्या ललिताद्रिपुरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीही ही उत्तर प्रदेशची असून ती शिक्षणासाठी म्हैसूरला आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी मंगळवारी चामुंडा हिल्सच्या दिशेनं तिच्या प्रियकरासोबत दुचाकीने जात होती, अचानक काही जणांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण जेव्हा त्यांना पैसे मिळाले नाहीत, तेव्हा पीडितेच्या मित्राला मारहाण करण्यात आली आणि दोघांना निर्जन स्थळी नेलं. यानंतर दोन जणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले तर प्रियकरावर दगडाने हल्ला करून त्याला जखमी केलं. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिचा मित्र रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात लोकांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हैसूरचे पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या पथकं स्थापन केली आहेत.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आरोपींना पकडण्यासाठी कडक पावलं उचलण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. राज्याचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र यांनी ही घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.


bottom of page