top of page
Writer's pictureMahannewsonline

नागपूरमध्ये १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाउन लावण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले परंतु, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे नागपुरात आता पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

लॉकडाउनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले असून लॉकडाउनच्या काळात खासगी कार्यालयं बंद राहणार आहेत. शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील,” असं नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं.


लॉकडाउनमध्ये मद्यविक्री दुकान बंद राहतील, मात्र त्यांची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. तसंच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. ओळखपत्र बाळगणं आवश्यक असेल असंही त्यांनी सांगितलं. या काळात १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधी तसंच स्वयंसेवी संस्थांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचं आवाहन नितीन राऊत यांनी केलं.



लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकानं सुरु राहतील. डोळ्यांचे दवाखानेही सुरु असतील,असं नितीन राऊत यांनी सांगितलं. “घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल,” असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.


bottom of page