top of page
Writer's pictureMahannewsonline

नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के

नांदेडमध्ये आज सकाळी ८.३० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.4 रिस्टर स्केल इतकी होती. त्याशिवाय अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज देखील आला. lयामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर असल्याची माहिती भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राने दिली आहे.

नांदेड शहरात तसेच जिल्ह्यातील अर्धापुर, मालेगाव , हिमायतनगर, मुदखेड, हदगाव, परिसरात हे भूकंपाचे धक्के जाणवले. शहरासह जिल्हाभरात बसलेल्या ह्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे घरातील वस्तू हादरल्या असल्याचे नागरिकांनी सांगितलं. भूकंपामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.


bottom of page