top of page
Writer's pictureMahannewsonline

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नंदुरबार जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत (सीएसएस) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे देशात १५७ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. यातील ४० वैद्यकीय महाविद्यालये ही देशातील आकांक्षी जिल्हयांमध्ये उभारण्यात येणार आहेत. आकांक्षी जिल्हयांच्या पहिल्या यादीत १६ जिल्हयांमध्ये ही महाविद्यालये उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून यात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयाचा समावेश आहे.

केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत तीन टप्प्यात देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत असून आतापर्यंत ७० महाविद्यालये उभारण्यात आलेली आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज लेाकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.


bottom of page