top of page
Writer's pictureMahannewsonline

.... खरं तर हेच मराठा समाजाचं मोठं दुर्दैव ; नरेंद्र पाटलांनी व्यक्त केली खंत

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने चक्का जाम आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे सरकारमधील ओबीसी समाजातील मंत्रीही एकजूट झाले आहेत. याकडे लक्ष वेधत माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा मंत्र्यांच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

लोणावळ्यात ओबीसी व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबिर पार पडलं. या शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांतील मंत्री आणि नेत्यांसह भाजपासह इतर पक्षांतील ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर समाजातील सर्व मंत्री आणि नेते एकत्र आल्याचं बघायला मिळालं. याकडे लक्ष वेधत नरेंद्र पाटील यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली.

“ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर येताच ओबीसी समाजाचे सर्व मंत्री एकत्र येतात, मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात, खरं तर हेच मराठा समाजाचं मोठं दुर्दैव आहे. समाजाला डावलून राजकारणाला उराशी धरणाऱ्या विकृतीला मराठा बांधव नक्कीच उत्तर देतील,” अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी संताप व्यक्त केला.


bottom of page