top of page
Writer's pictureMahannewsonline

पाहा LIVE: नासाचे हेलिकॉप्टर आज मंगळ ग्रहावर करणार उड्डाण

नासा आज इतिहास रचण्यास सज्ज


वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेले नासाचे हेलिकॉप्टर Ingenuity आज पहिल्यांदा उड्डाण करणार आहे. या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. नासाकडून या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण (LIVE) करण्यात येणार आहे.


वजनाने अतिशय हलके असणारे नासाचे Ingenuity हेलिकॉप्टर सोमवारी आपल्या उड्डाणाचा प्रयत्न करणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी ३.४५ वाजता होईल.


पाहा LIVE:


हेलिकॉप्टरचे उड्डाण याआधी ११ एप्रिल रोजी होणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हे उड्डाण टाळण्यात आले. हेलिकॉप्टरचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले आहे. दरम्यान १६ एप्रिल रोजी मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, हेलिकॉप्टरने रॅपिड स्पिन चाचणी यशस्वी केली आहे. आता या हेलिकॉप्टरला मंगळावरील वातावरणात उड्डाण घ्यावे लागणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर काही अंतर फिरण्यास यशस्वी झाले तरी या मंगळ मोहिमेला मोठे यश मिळणार आहे.


bottom of page