top of page
Writer's pictureMahannewsonline

नाशिकमधील "या" सहकारी बँकेवर RBI ची कारवाई

मुंबई: नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकमधील एका सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई करत बँकेला 50.35 लाखांचा दंड ठोठावला आहे. "जनलक्ष्मी सहकारी बँक" असं या बँकेचं नाव आहे. जनलक्ष्मी सहकारी बँकेने जमा खात्यांमधील रक्कमेची प्लेसमेंट आणि क्रेडिट इन्फोर्मेशन कंपनीज (CICs) संबंधित निर्देशांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय, रिझर्व्ह बँकेकडून गाझियाबाद येथील नोएडा कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेवरही दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला कर्जासंबंधीच्या नियमांचे पालन न केल्याने 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

स्पॉन्सर बँका आणि SCBs/UCBs यांच्यातील पेमेंट यंत्रणा मजबूत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काही धोरणे आखून देण्यात आली आहेत. या धोरणांचे पालन न करणाऱ्यांकडून रिझर्व्ह बँक दंडात्मक कारवाई करते.


काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.



bottom of page