top of page
Writer's pictureMahannewsonline

‘माझी वसुधंरा अभियान’ स्पर्धेत नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना जिल्हा गटातून व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना जिल्हा परिषद गटातून तृतीय पुरस्कार प्रदान

नाशिक : नाशिक जिल्ह्याने माझी वसुधंरा अभियान 2021-21 या स्पर्धेत 31 पुरस्कारापैकी नाशिक जिल्ह्याला एकूण पाच पुरस्कार प्राप्त झाले आहे. यामध्ये राज्यात माझी वसुधंरा अभियानाची सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या वैयक्तिक गटात राज्यातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदान केला आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या ४ गटामधील पहिल्या ५० मध्ये म्हणजे एकूण २०० मध्ये नाशिक जिल्ह्याच्या एकूण ६ नागरी संस्थांचा समावेश आहे. त्या मधील २ पहिल्या १२ मध्ये आहेत. जिल्हास्तरावरून सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्या पर्यावरण पूरक कामासंदर्भात केलेल्या प्रभावी संनियंत्रणची दखल घेऊन हा पुरस्कार राज्य शासनाने प्रदान केला आहे.

त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांना तृतीय क्रमांकाच्य पुरस्काराने मा मुख्यमंत्री यांनी सन्मानित केले. माझी वसुधंरा अभियानात सर्वोत्कृष्ट अमृत शहरांमध्ये नाशिक महानगरपालिकेला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महापौर सतीष कुळकर्णी व महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांना प्रदान करण्यात आला. प्रथम क्रमांकाची उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव बसंवतला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट नगरपंचायत मध्ये उत्तेजनार्थ प्रथम पुरस्कार निफाड नगरपंचायतीला प्रदान करण्यात आला आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऑनलाईन सन्मान सोहळ्याचे आयोजन मंत्रालय,मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थित सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त अरविंद मोरे, नगर विकास विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक संगीता धायगुडे उपस्थित होते.


bottom of page