top of page
Writer's pictureMahannewsonline

नाशिकमध्ये बुधवारपासून कडक लॉकडाऊन

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध जिल्ह्यात निर्बंध कडक केले जात असतानाच नाशिक शहरातही कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकमध्ये बुधवार, दि. १२ मे पासून दहा दिवस शहरात कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात शहरातील सर्व दुकाने बंद राहतील. हॉस्पिटल आणि मेडिकल सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली असल्याची माहिती नाशिकचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

राज्यातील अनेक जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वेगानं होत असून, रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांनंतर आता नाशिक शहरातही लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाउनची मुदत संपेल.


bottom of page