top of page
Writer's pictureMahannewsonline

नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द

मुंबई : खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द करत दोन लाखांचा दंडदेखील ठोठावला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं तर संबंधित सदस्याच पद रद्द होऊ शकतं. आता नवनीत राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता.त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करत 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने जरी रद्द केलं असलं, तरी राणा यांना सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे. नवनीत राणा आता सुप्रीम कोर्टात धाव घेऊन, हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.




bottom of page