top of page
Writer's pictureMahannewsonline

अभिमानास्पद : महाराष्ट्रातील ३२ उमेदवारांची एनडीए (NDA) मध्ये निवड

मुंबई ; नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या नौदल विभागाच्या निकालाची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली असून यामध्ये ४७८ जणांची निवड करण्यात आली आहे. अभिमानाची बाब म्हणजे यापैकी ३२ जण हे महाराष्ट्रातील आहेत. अदित्य सिंह राणा याने सर्वाधिक १११६ गुण मिळवत पहिला क्रमांक, नकुल सक्सेना १०७७ गुण मिळवत दुसरा तर देवेन नामदेव शिंदे याने १०७१ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे..


निकाल पाहण्यासाठी

  • अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.

  • त्यानंतर या वेबसाईटवरील ‘National Defence Academy and Naval Academy Examination (II), 2020, Marks of Recommended Candidates’ पर्यायावर क्लिक करा.

  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर समोर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पीडीएफ स्वरुपात दिसेल.

संरक्षण दलाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करामध्ये नवीन उमेदवार निवडण्याचं काम पाहिलं जातं. या निकालासंदर्भात उमेदवारांना काही शंका असल्यास ते 011-23385271/ 011-23381125/ 011-23098543 या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळामध्ये फोन करुन माहिती विचारु शकतात.


bottom of page