top of page
varsha-gaikwad.jpeg

मिथून चक्रवर्तीं भाजपात दाखल

मागील काही दिवसांपासून मिथून चक्रवर्ती हे पुन्हा राजकारणात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत मिथून चक्रवर्ती यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला बळ मिळालं होतं. भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात असतानाच आज मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेल्या कोलकातातील ब्रिगेड मैदानातील व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला.

यावेळी बोलताना मिथून चक्रवर्ती म्हणाले, “मी कोब्रा आहे. कुणी जर हिसकावून घेत असेल, तर मी उभा राहिल. माझा एक दंश पुरेसा आहे. मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेल,” असं मिथून चक्रवर्ती म्हणाले. मिथुन यांनी २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

re.jpg
Image-empty-state.png

"कोरोना"कारण नाही राजकारण !

Image-empty-state.png

कांजूरमार्ग : आरोप-प्रत्यारोप

Image-empty-state.png

भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 1 कोटीवर

Image-empty-state.png

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे

bottom of page