top of page
Writer's pictureMahannewsonline

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला ईडीचे समन्स

तिहार कारागृहातून २०० कोटी रुपयांच्या वसुलीचे रॅकेट चालवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून तपास सुरु आहे. या प्रकरणी ईडीने आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस यांना साक्षीदार म्हणून बोलावले आहे. नोरा फतेहीला आज चौकशीसाठी बोलावले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा ईडीने जबाब नोंदवला होता. चार तास चौकशी केल्यानंतर, तिचे निवेदन मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) साक्षीदार म्हणून रेकॉर्ड करण्यात आले. ज्यामध्ये सुकेश चंद्रशेखर, २०० कोटींपेक्षा जास्त फसवणूक आणि खंडणीचा आरोपी आहे. त्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पाल तिहार कारागृहातून २०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. सुकेशने नोरा फतेहीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता.

२०० कोटींच्या खंडणीचा मुख्य आरोपी सुकेश तिहार जेलमधून अभिनेत्री जॅकलिनला फोन करायचा. एजन्सींना सुकेश चंद्रशेखरचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. याद्वारे तपास यंत्रणांना जॅकलिनसोबत झालेल्या फसवणुकीची माहितीही मिळाली.


bottom of page