top of page
Writer's pictureMahannewsonline

खड्ड्यामुळे अपघात; कार मालकाची थेट नितीन गडकरींकडे तक्रार; अवघ्या २ तासांत कारवाई

पावसाळ्यात अनेकदा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते..असं चित्र पाहायला मिळतं. गावागावातील रस्तेच नाहीत तर मुंबई, पुण्यासारखी मेट्रो शहरे आणि राष्ट्रीय महामार्गांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातामुळे काहींचे बळी जातात तर काहींना गंभीर दुखापती होतात. असाच एक अपघात मध्य प्रदेशातील एका राष्ट्रीय महामार्गावर झाला, अपघातग्रस्त कार मालकाने थेट रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कडे तक्रार केली. यानंतर अवघ्या दोन तासांत तेथील खड्डे बुजविण्यात आले आणि कंपनीवर देखील कारवाई करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४७ हा रस्ता खराब असल्या कारणाने या रस्त्याचं दुरुस्तीचं काम ओरिएंटल स्ट्रक्चर इंजीनियरिंग कंपनी करीत आहे. त्यासाठी त्यांनी रस्त्यावर खड्डे खोदले आहेत. मात्र वाहन चालकांना सावध करण्यासाठी कोणताही बोर्ड लावलेला नाही. यामुळे वकिलासह दोन कारचा या ठिकाणी अपघात झाला. बैतूलमधील आमला येथे राहणारे वकील राजेंद्र उपाध्याय आपल्या आईवर उपचार केल्यानंतर नागपूरहून आपल्या घरी जात होते. त्यादरम्यान हिरवा गावाजवळील रस्ता खराब असल्याकारणाने त्यांची कार पलटली. या अपघातात ते आणि त्यांची आई जखमी झाले. या प्रकरणी अपघातग्रस्त कार मालकाने थेट रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कडे तक्रार केली.

नितीन गडकरी यांनी तक्रारीची त्वरित दखल घेतली. गडकरी यांच्या आदेशावरून NHAI ने ओरिएंटल स्ट्रक्टर इंजिनिअरिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला असून तेथील खड्डे अवघ्या दोन तासांत बुजविण्यात आले.


bottom of page