top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्रातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामांसाठी २७८० कोटींची घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आल्याचं सांगितलं आहे. गडकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली.



राष्ट्रीय महामार्ग १६६ ई वरील गुहार चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी १७१ कोटी रुपये, जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे च्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये, गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान मोठे पूल बांधण्यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी, राष्ट्रीय महामार्ग ७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपये, तिरोरा ते गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दोन पदरी रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी २८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं गडकरींनी सांगितलं आहे.



त्याचबरोबर तारीरी- गगनबावडा – कोल्हापूर या राष्ट्रीय महारमार्ग १६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये, तिरोरा गोंदियादरम्यानच्या राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपये, नागपूरमध्येही आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उढ्डाण पूल बांधण्यासाठी एकूण ४७८ कोटी ८३ लाखांचा रुपये, नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपये, आमगाव गोंदियादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग ५४३ साठी २३९ कोटी २४ लाख रुपये , राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.




bottom of page