top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले... , मात्र स्वतःच्या घरासमोरचा रस्ता बांधता येईना!

स्वतः नितीन गडकरी यांनीच सांगितला किस्सा !

देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र नागपुरातील स्वतःच्या घरासमोरील दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधता आला नाही. खुद्द नितीन गडकरींनीच यासंदर्भातला किस्सा सांगितला आहे.

ते म्हणाले, “ काही वर्षांपूर्वी नागपुरातील वर्धा रोडवर डिफेन्सची लाईन होती. तेव्हा ती ३५ हेक्टर जागा मी डिफेन्सकडून अडीच कोटी रुपयांत मिळवली. हाफीज काँट्रॅक्टरनी रस्त्याचं आणि तिथल्या कामाचं डिझाईन तयार केलं. पण या कामानंतर तो मला म्हणाला, साहेब, तुम्ही म्हणाल तर आठव्या मजल्यावरून उडी मारेन, पण यानंतर मला कुठलं महानगरपालिकेचं काम करायला नका सांगू. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये काम करतो त्याला नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे”,

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, “मी कधी थकत नाही. पण मला कधी कधी वाटतं आपणहे काम करावं की नाही करावं. मी एक लाख कोटी रुपयांचा दिल्ली-मुंबई हायवे जमीन अधिग्रहण करून जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा मुधोजीराजे दोन किलोमीटरचा रस्ता करता करता पार थकून गेलो. मी ६ वर्ष झाले महालात नाही गेलो. मी बाहेर राहातो. त्या रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयात अनेकदा अर्ज जातात आणि न्यायालयातून त्याला स्थगिती येते”, असं गडकरी यावेळी म्हणाले.

“एक लाख कोटी रुपयांचा रस्ता दोन वर्षांत झाला, पण हा दोन किलोमीटरचा रस्ता करता करता पुऱ्या धापा टाकून थकवून टाकलं. अजून काही काम होत नाही”, अशी टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली.


bottom of page