top of page
Writer's pictureMahannewsonline

राजकारण न करता सगळ्यांना मदत करा; सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड, झेंडे ...

कोरोनाच्या कठीण काळात स्वतःची, परिवाराची आणि समाजाची जास्तीत जास्त काळजी घ्या. निष्काळजीपणा करु नका. त्याचबरोबर राजकारण न करता सगळ्यांना मदत करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. भाजपाच्या नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाप्रसंगी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले. "राजकारण करु नका. सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड, झेंडे लावले पाहिजेत असं नाही. अशावेळी आपण जर काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही. तुम्ही जे कऱणार आहात, त्याचं क्रेडीट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे. मीडियामुळे ते सर्वांपर्यत पोहोचतंच. त्यामुळे आपण आपल्या सेवाकामाचा लोकांना माहिती होणं इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे. त्याचा फार बागुलबुवा करणं म्हणजे एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे आणि चार जण वारंवार त्याच्यासोबत फोटो काढून पाठवत आहेत, असं करु नका. त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल."


राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच काही त्याच्यातला भाग नाही. समाजाच्या मागे, गरीब माणसाच्या मागे, जात, पंथ, धर्म, पार्टी, पक्ष विसरुन सगळ्यांच्या मागे आपण योग्य प्रकारे मदतीसाठी उभं राहणं हे महत्त्वाचं आहे, असेही ते म्हणाले.


bottom of page