top of page

विमानतळ, RSS मुख्यालयासह इतर ठिकाणी फोटो- व्हिडिओ काढण्यास मनाई

नागपूर : नागपुरातील महत्वाच्या स्थळांची दहशतवादयांकडून रेकी केली जात असल्याची बाब समोर आल्याने आता पोलिसांनी महत्त्वपुर्ण निर्णय घेतलाय. संघ मुख्यालयासह, विमानतळ, आरबीआय इमारत आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले. यासंदर्भात सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांनी आदेश काढले.

रेकी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा, एटीएस आणि एनआयए संयुक्तपणे करत आहे. पोलिसांनी याप्रकरणी महत्वाचा निर्णय घेत संघ मुख्यालयासह विमानतळ, आरबीआय इमारत आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी घेण्यास मनाई केली आहे. सोबतच असे केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले.

दरम्यान, गुप्तचर यंत्रणेने संशयित दहशतवाद्यांचे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. जुन्या भोपाळ शहरातील ऐशबाग पोलिस ठाण्यापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या फातिमा मशिदीजवळील एका इमारतीत संशयित दहशतवादी भाड्याच्या घरात राहत होते. गुप्तचर यंत्रणेने कारवाई करून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली.


bottom of page