top of page
Writer's pictureMahannewsonline

सचिन वाझे यांना घेऊन एनआयए’चं मिठी नदी पात्रात सर्च ऑपरेशन

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने आज दुपारी (रविवार) बीकेसी परिसरात मिठी नदीपात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी एनआयएने सोबत सचिन वाझे यांनाही आणले होते. यावेळी नदी पात्रातून मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने लॅपटॉप, सीपीयू, डीव्हीआर मशीन, प्रिंटर आणि दोन नंबर प्लेट्स आणि अन्य साहित्य मिळालं. यामुळे एनआयएच्या हाती या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर असून लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अटकेत असणारे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयला मनसुख हिरेन यांचा मृतेदह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) आपल्याकडील पाच मोबाइल नष्ट केल्याची माहिती दिली आहे.


bottom of page