top of page
Writer's pictureMahannewsonline

निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

संतोष परब मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मंगळवार, १ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी निलेश राणेंसह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी पत्रात म्हटलं, १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सत्र न्यायालयाच्या बाहेर निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतानादेखील याठिकाणी बंदोबस्ताकरिता तैनात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: आणि समर्थकांनी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण विविध वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारीत झाले आहे. तरी आपण चौकशी करुन निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.


bottom of page