top of page
Writer's pictureMahannewsonline

मुंबई : मास्कविना फिरणाऱ्यांकडून तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण आणि मास्क या दोन गोष्टी महत्वाच्या असल्याचं सांगत राज्य सरकारकडून आवाहन आणि जनजागृती केली जात आहे. मात्र अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत. अशा बेफिकीर नागरिकांवर मुंबई पालिका, मुंबई पोलीस तसंच रेल्वेकडून एप्रिल २०२० ते २३ जून २०२१ या दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तब्बल ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करत महापालिकेनं ५०.२९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. मुंबई पोलिसांनी ७ कोटी ६२ लाख ७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर रेल्वेने एकूण ५० लाख ३९ हजार २०० इतका दंड वसूल केला आहे.

मास्कचा वापर न करणाऱ्यांमुळे अन्य नागरिकांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा, असं आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.


bottom of page