top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : विद्यार्थीनीने सांगितली आपबिती; म्हणाली,"... विमानतळावर पाऊल ठेवताच सहा बॉम्बस्फोट झाले..."

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थीनीशी नाना पटोले यांनी साधला संवाद

रशियाने काल (गुरुवारी) युक्रेनवर हल्ला केला. अनेक भारतीय विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या मुबईच्या एका विद्यार्थीनीशी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधलाय. या संवादाचा व्हिडीओ पटोले यांनी ट्विट केला आहे. "निवडणूक प्रचार थांबवून लवकरात लवकर आपल्या देशातील मुलांना मायदेशी घेऊन या मोदीजी,” अशा कॅप्शनसहीत नाना पटोलेंनी हा व्हिडीओ ट्विट केलाय.

“युक्रेनमधील संकटात अडकलेल्या मुंबईतील चैताली नावाच्या विद्यार्थीनीशी आज मी संवाद साधला. युद्धामुळे तेथील परिस्थिती फार चिंताजनक झालीय. तेथे अडकलेले भारतीय विद्यार्थी भारत सरकारच्या मदतीची अपेक्षा करतायत. निवडणूक प्रचार थांबवून लवकरात लवकर आपल्या देशातील मुलांना मायदेशी घेऊन या मोदीजी,” अशा कॅप्शनसहीत नाना पटोलेंनी हा व्हिडीओ ट्विट केलाय.





bottom of page