top of page

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू होणार नवीन पेन्शन योजना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनाही नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा

✅राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली

✅गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

✅ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार

✅थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी

✅पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार

✅नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

✅सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

✅शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

✅ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ



bottom of page