top of page
Writer's pictureMahannewsonline

पुणे-नगर रोडवर ऑइल टँकर उलटला

पुणे : ऑइल टॅंकर दुभाजकाला धडकून पलटी झाला आहे. ही घटना पुणे - नगर रस्त्यावरील चंदननगर येथे रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रीपासून टँकरमधून ऑईल गळती सुरू आहे .ऑईल रस्त्यावर पसरले असल्यामुळे नगर रस्त्यावरची वाहतूक वळविण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या ऑइल टँकर चंदननगर येथे आला असता एका ट्रॅव्हल बस चालकाने अचानक रस्त्याच्यामध्ये बस आणली. त्यामुळे टँकर दुभाजकाला जाऊन धडकला आणि पलटी झाला. टँकर पलटी झाल्यानंतर स्थानिकांनी धाव घेत ड्रायव्हर आणि त्याच्या मदतनिसाला सुखरूप बाहेर काढले. रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवरून वाहने घसरू नयेत म्हणून याच कंपनीचा दुसरा टॅंकर रस्त्याला आडवा लावण्यात आला आहे. नगर रस्त्यावर त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने ही वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे.


bottom of page