top of page
Writer's pictureMahannewsonline

अब लाशें नहीं गिननी Omicron ... असं लिहून डॉक्टरने केली पत्नी, दोन मुलांची हत्या

कानपूर: येथील एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला असून पोलीस या डॉक्टरचा शोध घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक डायरी मिळाली आहे त्यात नोट लिहिलेली आहे. 'अब और कोविड नही. ये कोविड सबको मार डालेगा. अब लाशें नहीं गिननी. Omicron ', असा मजकूर यात लिहिण्यात आला आहे.

कानपूरमधील कल्याणपूर भागात राहणारा डॉक्टर सुशीलकुमार हा एका खासगी रुग्णालयात सेवेत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सुशीलकुमारने पत्नी चंद्रप्रभा (४८) यांचा डोक्यात हातोडा मारून तर मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी यांचा गळा दाबून हत्या केली. सुशीलकुमारनेच स्वतः याबाबतची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भाऊ सुनील याला दिली आणि पोलिसांना कळवण्यास सांगितले. मी डिप्रेशनमध्ये असल्याचे पोलिसांना सांग, असेही त्याने भावाला सांगितले.

दरम्यान, सुनील हा तातडीने घटनास्थळी पोहचला व त्याने दरवाजाचे टाळे तोडून घरात प्रवेश केला असता तिघांचे मृतदेह पाहून तो हादरला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथून पोलिसांनी सुशीलची डायरी जप्त केली असून त्यात एक नोट लिहून ठेवल्याचे आढळले आहे. कोविड आता सगळ्यांनाच मारणार आहे. त्यामुळे आता मृतदेह मोजण्याची गरज नाही...ओमिक्रॉन!, अशा प्रकारचा मजकूर यात लिहिण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी घटनास्थळी पाहणी केली. सुशील गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे कुटुंबीयांनीही सांगितले.


नोट मध्ये लिहिले..
'अब और कोविड नहीं, ये कोविड ओमिक्रॉन अब सभी को मार डालेगा। अब और लाशें नहीं गिननी हैं। अपनी लापरवाही के चलते करियर के उस मुकाम पर फंस गया हूं। जहां से निकलना असंभव हैं। मेरा कोई भविष्य नहीं है। मैं अपने होश-ओ-हवास में अपने परिवार को खत्म करके खुद को खत्म कर रहा हूं। इसका जिम्मेदार और कोई नहीं। मैं लाइलाज बीमारी से ग्रस्त हो गया हूं। आगे का भविष्य कुछ भी नजर नहीं आ रहा है। इसके अलावा मेरे पास कोई और चारा नहीं है। मैं अपने परिवार को कष्ट में नहीं छोड़ सकता। सभी को मुक्ति के मार्ग में छोड़कर जा रहा हूं। सारे कष्टों को एक ही पल में दूर कर रहा हूं। अपने पीछे मैं किसी को कष्ट में नहीं देख सकता। मेरी आत्मा मुझे कभी भी माफ नहीं करेगी। आंखों की लाइलाज बीमारी की वजह से मुझे इस तरह का कदम उठाना पड़ रहा है। पढ़ाना मेरा पेशा है। जब मेरी आंख ही नहीं रहेगी तो मैं क्या करूंगा'। अलविदा...

चंद्रप्रभा या शिवराजपूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. शिखर दिल्लीच्या सीएडी संस्थेतून अभियांत्रिकीची तयारी करत होता. बेट्टी वुडबाईन स्कूलमधून हायस्कूलचे शिक्षण घेत होती.


bottom of page