top of page
Writer's pictureMahannewsonline

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ 155260 नंबरवर तक्रार करा...

नवी दिल्लीः माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता जवळपास सर्व कामे ऑनलाईन होऊ लागली आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी नेहमीच अलर्ट राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक जण ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत असून ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल आणि गृह मंत्रालयाने लोकांच्या मदतीसाठी १५५२६० हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

केंद्र सरकार आणि बँका यांच्याकडून लोकांना वेळोवेळी सूचना देण्यात येतात. जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांना तात्काळ तक्रार करण्याची सूचना केली जाते. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांची सायबर सेलने मिळून १५५२६० हेल्पलाइन सुरू केली आहे. जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर तात्काळ या नंरबरवर तक्रार करू शकता. यावर कॉल करू शकता. यानंतर ७ ते ८ मिनिटात अकाउंटवरून काढण्यात आलेली रक्कम ज्या दुसऱ्या अकाउंटमध्ये गेली आहे. त्या हेल्पलाइनवरून त्या बँक किंवा आर्थिक संस्थेला अलर्ट मेसेज मिळेल. त्यानंतर पैसे होल्डवर जातील.


या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यानंतर नाव, नंबर आणि फसवणुकीची वेळ विचारली जाईल. माहिती एकत्रित केल्यानंतर त्यासंबंधित जोडलेले पोर्टल, संबंधित बँक किंवा अर्थ संस्थेला पोहोचवली जाईल. ज्यावेळी फसवणूक झाली त्यावेळी तात्काळ तक्रार केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.



bottom of page