top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; १७ एप्रिल रोजी मतदान

मुंबई: निवडणूक आयोगाकडून पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख करण्यात आली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या बाबत कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, निवडणुकीबाबत प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.


असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
मतदान – 17 एप्रिल 2021
निवडणूक निकाल – 2 मे 2021

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ऑक्टोबर महिन्यात भालकेंना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे देखील झाले होते. मात्र नंतर त्यांची तब्येत ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. भालकेंना मूत्रपिंड आणि मधुमेहाचा त्रास होता. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बरोबरच संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्याच्या भारतीय जनता पक्षात हालचाली सुरू असल्याचे समजते. दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.


या मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या लक्षात घेता येथे धनगर समाजाच्या नेत्याला महाविकास आघाडीने किंवा भाजपने उमेदवारी द्यावी, असे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी होळकरपाडा येथे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाजाची एक महत्वाची बैठकही पार पडली

bottom of page