top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या

मुंबई : “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांना मिळालेली आहे. म्हणूनच स्व. भारतनाना भालके यांचे स्वप्न पूर्ण कारणांसाठी आपण सर्वानी भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला केले. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके हे निवडणूक लढवित आहेत. आतापर्यंत भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं. या प्रेमाचा आशीर्वाद आपण नक्कीच या निवडणुकीत भगीरथ भालकेंच्या पाठीशी उभा कराल असा विश्वासही कोल्हेंनी व्यक्त केला.


“महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे. भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत केले.


अमोल कोल्हे यांचे ट्वीट


bottom of page