top of page

ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात; कार जळून खाक

क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. उत्तराखंडमधील रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. बघता बघता कार जळून खाक झाली. या कारचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.



bottom of page