top of page
Writer's pictureMahannewsonline

१५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून चर्चेत असलेल्या परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.


bottom of page