top of page

मोठ्या भावानंतर लहान भावाचाही अपघातात मृत्यू...


दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. परभणीच्या सेलू ते सतोना या रस्त्यावर ही घटना घडली आहे. तर या अपघातामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे पाठवण्यात आलं आहे. सचिन जोगदंड असं अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव असून सचिन जोगदंड यांचे मोठे भाऊ विजय जोगदंड यांचाही काही वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जोगदंड हे औरंगाबाद येथून आपल्या आईला भेटण्यासाठी दुचाकीवरून परभणीकडे येत होते. मात्र त्यांची दुचाकी सेलू- सातोना रस्त्यावर आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये सचिन जोगदंड यांच्या छातीला दुचाकीचे हँडल लागल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत.


bottom of page