top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : "माझी तुझी रेशीमगाठ" मधील परी म्हणते, मी करणार अँकरींग....

मुंबई :"झी मराठी"वरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' मध्ये या आठवड्यात "माझी तुझी रेशीम गाठ" मधील छोटी परी हजेरी लावणार आहे. याचाच एक प्रोमो झी मराठीने इंस्टाग्रामवर नुकताच शेअर केलाय. या प्रोमो मध्ये गोंडस परी आणि डॉ, निलेश साबळे यांच्यात अँकरींगवरुन वाद होताना दिसत आहे.

"चला हवा येऊ द्या" च्या सेटवर "माझी तुझी रेशीमगाठ" मालिकेतली परी अवतरली...या प्रोमो मध्ये परी म्हणते, नमस्कार मी तुमची लाडकी परी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येवू द्या... यावर निलेश साबळे परीला विचारतात तु झी मराठी अवॉर्डचं अँकरींग करणार आहेस का? यावर परी म्हणते हो! यावरुन निलेश म्हणतात अँकरींग तर मी करणार आहे यावर परी म्हणते मी करणार अँकरींग, यावंर निलेश परीला सांगतात मला फोन आला होता चॅनलचा, परी म्हणते मला फोन आला होता, यावर निलेश म्हणतात मला पैसे मिळणार आहेत.


यावर परी म्हणते मला देणार आहेत यांवर निलेश म्हणतात काय देणार आहेत. यावर परी म्हणते बिस्कीट पुडा आणि मंचावर उपस्थित सगळे हसू लागतात तेवढ्यात निलेश म्हणतात बिस्कीट पुढ्यात पोरगी पटवली. याच्यांतलं हे गोड भांडण सध्या सोशल मीडियावर चांगलच गाजतय. हा एपिसोड आपल्याला या सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पहायला मिळेल. याशिवाय चला हवा येऊ द्याचे विनोदवीर आपल्या विनोदाने हास्याचा तडका लावणार आहेत.


bottom of page