top of page

राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीवर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. पवार, सीए शाह यांची निवड!

राज्यपाल कार्यालय, राज्य शासनाकडून झाली नियुक्ती!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार आणि वित्त व लेखा अधिकारी सीए श्रेणीक शाह यांचा निवडीनिमित्त सत्कार केला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर.

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांची राज्यपाल कार्यालयाकडून राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या निरीक्षक समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. तसेच विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह यांची राज्य शासनाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' यासंदर्भात अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ समितीवर निवड केली आहे.

प्रभारी कुलसचिव डॉ. पवार, सीए शाह यांची राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीवर निवड झाल्यानिमित्त कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर आदी उपस्थित होते.

राज्यपाल कार्यालयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे 2022-23 चा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी निरीक्षक समितीत प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठासाठी हा मोठा बहुमान असल्याचे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. याचबरोबर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना शैक्षणिक सवलती देणे, विद्यापीठ व महाविद्यालयांच्या आर्थिक स्थितीबाबत अहवाल तयार करून विद्यापीठे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून उच्चशिक्षणाच्या गरजांबाबत अभ्यास करून अहवाल तयार करणे यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यांत शासनास सादर करण्यात येणार आहे, अशा या महत्त्वपूर्ण समितीवर वित्त व लेखा अधिकारी सीए शाह यांची निवड करण्यात आली आहे. दोघेही अधिकारी उत्तम प्रकारे काम केल्यानेच त्यांची निवड होऊन विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यानिमित्त डॉ. पवार व सीए शाह यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


bottom of page