top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : पवार कुटुंबीयांचा पाडवा; सुप्रिया सुळेंनी शेअर केले व्हिडिओ ...

दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यानंतर येणारा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते. तर पती तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो. पवार कुटुंबीयांनीही पाडव्याचा सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी औक्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

'उभयतांमधील बंध अधिक घट्ट करणारा हा दिवाळी पाडव्याचा क्षण, आईने बाबांचे औक्षण केले', असं म्हणत त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा यांच्या औक्षणाचे क्षण टिपले आहेत. 'अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी ही जोडी आमची अखंड उर्जा., वहिनी दादांचं औक्षण करीत असतानाचा हा क्षण,' असं कॅप्शन त्यांनी दिलंय.





राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि त्यांची पत्नी कुंती यांच्याही औक्षणाचे क्षण आणखी एका व्हिडीओमध्ये टिपले आहेत.

'रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या, पाडव्याचा हा सण, बारामतीत औक्षण करून साजरा केला,' असं म्हणत सुप्रिया सुळेंनी स्वत:चाही व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओंसोबतच त्यांनी कुटुंबीयांसोबतचा एक खास फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. 'फॅमिली टाइम' असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.


bottom of page