top of page
Writer's pictureMahannewsonline

'तृणमूल'ने साधली विजयाची हॅटट्रिक

कोलकाता: संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षच पुन्हा सत्तेत आला असून ममता बॅनर्जी यांच्या पुढे नरेंद्र मोदी- अमित शाह यांचा करिष्मा काही चालला नाही. या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला होता. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची तर ममता बॅनर्जी यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई झाली होती.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवित विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांची घोर निराशा झाल्याचं निवडणूक निकालावरून दिसत आहे, भाजपने केवळ ७५ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपाने सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आय़ोगाने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसंच निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला आहे.



bottom of page