top of page
Writer's pictureMahannewsonline

.... म्हणून अभिनेत्याने केली पंतप्रधान मोदी आणि ममता दीदींकडे तक्रार

बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी याने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मादी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे एक तक्रार केली आहे. फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीवर दिलेली ऑर्डर न मिळाल्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रोसेनजीतने ही तक्रार केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्याचे हे ट्वीट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केले.

"३ नोव्हेंबर रोजी, मी फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगीवर एक ऑर्डर दिली. थोड्या वेळानंतर ऑर्डर डिल्वहर होत असल्याचं दिसलं परंतु माझ्यापर्यंत ऑर्डर पोहोचली नाही. स्विगीकडे ही तक्रार दाखल केली. मी ऑर्डरचे पैसे आधीच दिले होते म्हणून त्यांनी मला पैसे परत केले,” असे ट्वीट करत प्रोसेनजीतने तक्रार केली आहे.

पुढे प्रोसेनजीत म्हणाला, ही पोस्ट शेअर करत मला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे होते कारण मला वाटतं की कोणीही या समस्येचा सामना करू शकतो. जर कोणी त्यांच्या पाहुण्यांसाठी फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून काही ऑर्डर केलं आणि जेवण आलंच नाही तर काय? जर कोणी पूर्णपणे फूड अ‍ॅप्सवर अवलंबून असेल तर काय होईल? ते उपाशी राहतील का? अशा अनेक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या विषयी बोलण्याची आवश्यकता असल्याचे मला वाटते. प्रोसोनजीतची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली तसेच त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला


bottom of page