Video: प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’चा ट्रेलर पाहिलात का ?
काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून दूर असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा या सीरिजमधील लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता ट्रेलरही रिलीज झाला आहे. या ट्रेलरला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
अॅक्शन, थरार व रोमान्सने भरपूर ‘सिटाडेल’ ही सीरिज प्रेक्षकांना अमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे. उत्कंठावर्धक ट्रेलर पाहून चाहते ही सीरिज प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
यामध्ये स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिलसारख्या कलाकारांसह रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्याही मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत.