top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी होती. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दाखल केली असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या “गेल्या दोन वर्षापासून भाजपा महाराष्ट्राच्या एकतेला आणि परंपरेला नख लावायचं काम करत आहे. सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल, याकडे त्यांच जास्त लक्ष आहे. २०१४ पासून भाजपा ज्या पद्धतीने व्यक्तीगत स्वार्थासाठी, कुरघोडीचं राजकारण करतोय. साम, दाम, दंड, भेद वापरुन सत्ता मिळालीच पाहिजे, यासाठी खालच्या पातळीचं राजकारण करुन कळस गाठलाय" असा आरोप चाकणकर यांनी केला. प्रवीण दरेकर यांनी अतिशय अश्लिल असे विधान केलं. जाहीर सभेत बोलत असतांना महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. दरेकर यांनी यावर माफी मागने अपेक्षीत होते. मात्र प्रवीण दरेकर यांनी 'मी या गोष्टीला ऐवढं महत्व देत नाही', असं वक्तव्य केलं .यातून त्यांचा उमर्टपणा, वैचारिक दारिद्रय दिसतं. म्हणून मी त्यांच्याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. न्याय मिळेल असा मला विश्वास आहे" असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशापुर्वी प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी दरेकरांनी केली होती.


bottom of page