top of page
Writer's pictureMahannewsonline

कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात टेनिसपटू लिएंडर पेस दोषी, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश

कौटुंबीक हिंसाचार प्रकरणात टेनिसपटू लिएंडर पेसला दोषी ठरवत मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयानं भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ साली रिया पिल्लईनं लिएंडर पेसच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. लिएंडर पेसनं रिया पिल्लईला एक लाख रुपये मासिक पोटगी तसेच घरभाडं म्हणून ५० हजार रुपये प्रतिमहिना द्यावे असे आदेश महानगर दंडाधिकारी कोमल सिंह राजपूत यांनी दिले होते.


रिया पिल्लईच्या म्हणण्यानुसार, ती लिएंडर पेससोबत जवळपास ८ वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यानंतर तिने २०१४ मध्ये लिएंडरवर गंभीर आरोप केले होते. लिएंडरनं मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक शोषण केल्याचं रियाचं म्हणणं आहे. त्याच्या वर्तणुकीचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचंही रियानं म्हटलं होतं. दरम्यान सध्या लिएंडर पेस अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे. काही काळापूर्वीच या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. लिएंडर पेसनं रियावर, तिनं अगोदरच विवाहित असल्याचं माझ्यापासून लपवलं असा आरोप केला होता.

bottom of page