top of page
Writer's pictureMahannewsonline

निवडणूक निकालानंतर प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा असणारे ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज मोठी घोषणा केली. प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली असल्याचं ते म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. जर भाजपाने दोन अंकी आकडा ओलांडला तर आपण संन्यास घेऊ असं ते म्हणाले होते. पण आपलं भाकीत खरं ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रशांत किशोर यांनीच सुरुवात केलेल्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून (I-PAC) आपण बाहेर पडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदाने देतील, पण मी संन्यास घेत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आय़ोगाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. निवडणूक आयोग भाजपाचा विस्तारित भाग असल्याप्रमाणे काम करत असल्याचं ते म्हणाले आहेत.


bottom of page