top of page

Video: नेपाळमध्ये ७२ प्रवाशांसह विमान कोसळलं

नेपाळमध्ये विमानाला मोठा अपघात झाला आहे. नेपाळमधील पोखराजवळ यति एअरलाईन्सचं ATR-72 विमान कोसळलं. या विमानात चार कर्मचाऱ्यांसह एकूण ७२ जण होते. काठमांडूहून हे विमान पोखराला जात होतं. पोखराजवळ पोहोचताच विमानाला अपघात झाला.

जुना विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती नेपाळी प्रसारमाध्यमांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मदतकार्याला सुरुवात झाली.



खराब हवामानामुळे विमानाला अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यति एअरलाईन्सचं विमान एका डोंगराला आदळलं. डोंगराला धडकल्यानंतर विमान नदीत कोसळलं. त्यानंतर विमानातून धूर येऊ लागला. दुर्घटनास्थळापासून बऱ्याच अंतरावरून हा धूर पाहायला मिळाला. अपघाताची माहिती मिळताच विमान कंपनी, विमानतळ प्राधिकरण, सुरक्षा दल, आपत्ती निवारण विभागानं युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केलं विमानात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी असल्याचं यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितलं.


bottom of page