top of page
Writer's pictureMahannewsonline

...अन् पंकजा मुंडे पोहोचल्या पान टपरीवर; स्वतःसाठी बनवलं खास पान, पाहा VIDEO

बीड: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वत: पान टपरीवर पानाचा विडा बनवून पानाचा आस्वादही घेतला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.


पाहा व्हिडीओ –

पंकजा मुंडे रविवारी परळी शहरात होत्या. तेव्हा एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे पान टपरीला भेट देण्यासाठी आग्रह धरला. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे त्याच्या पान टपरीवर गेल्या. यावेळी पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वतः पानाचा विडा तयार करत पानाचा आस्वादही घेतला.. पंकजा मुंडेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पान टपरीवरील कार्यकर्ते त्यांना पानाचा विडा कसा बनवायचा, त्यात काय घालायचं हे सांगताना दिसत आहेत. तर, पंकजा मुंडे त्यांच्या आवडीनुसार त्यांना हव्या असलेल्या गोष्टींनी पानाचा विडा बनवत आहेत.


bottom of page