top of page
Writer's pictureMahannewsonline

…तर ठाकरेच काय, मोदीही तुमच्याकडे येतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी साधला केंद्र व राज्य सरकारवर जोरदार निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सख्खे बंधू आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मागण्या मान्य होई पर्यंत जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला.

“मागण्या पूर्ण न होईपर्यंत जीएसटी भरणार नाही, असं आंदोलन करा. तुम्ही असं केलं, तर उद्धव ठाकरेच काय; नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील. नरेंद्र मोदी असो वा मग आणखी कुणी. आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहा. त्यांना सांगा, आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. आपण लोकशाहीत जगतोय, हुकुमशाहीत जगत नाही”, असं प्रल्हाद मोदी व्यापाऱ्यांना म्हणाले.

लॉकडाऊनमुळं अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. लॉकडाउनच्या काळात अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमभंग केल्याप्रकरणात हे गुन्हे दाखल केलेले असून, यासंदर्भातील तक्रारी व्यापाऱ्यांनी मोदी यांच्याकडे यावेळी मांडल्या. याचबरोबर इतरही मुद्दे त्यांनी प्रल्हाद मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले.


bottom of page