top of page
Writer's pictureMahannewsonline

दिलासादायक ; PMC बँकचे USFB मध्ये होणार विलीनीकरण; RBI ची घोषणा

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकच्या (पीएमसी बँक) ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. ज्या ग्राहकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते १० वर्षात पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँक मध्ये विलीनीकरणासाठी मसुदा योजना जाहीर केली आहे. यानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वे यूएसएफबीकडे येतील. यामध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांना पैसे परत करणे देखील समाविष्ट आहे. अशा अटी युएसएफबी सोबतच्या विलीनीकरणाच्या करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या पैशाचे रक्षण करता येईल.

३ ते १० वर्षात पूर्ण पैसे परत मिळणार

ज्या ग्राहकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील ३ ते १० वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. आरबीआयच्या मसुद्याच्या योजनेनुसार, युएसएफ बँक ठेवीदारांना पाच लाख रुपयांची हमी रक्कम देईल. त्यानंतर, बँक दोन वर्षांनी ५०,००० रुपये, तीन वर्षांनी एक लाख रुपये, चार वर्षांनी तीन लाख रुपये, पाच वर्षांनी ५.५ लाख रुपये आणि १० वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल.

यूएसएफबी ११०० कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी करत आहे, तर नियामक नियमांनुसार छोट्या वित्त बँकेसाठी फक्त २०० कोटी रुपये आवश्यक आहेत, असे आरबीयने म्हटले आहे. मसुदा योजनेअंतर्गत, १९०० कोटी रुपयांचे इक्विटी वॉरंट आहे, जे आठ वर्षांच्या कालावधीत कधीही वापरले जाऊ शकते. हे इक्विटी वॉरंट युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला १ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहे. आरबीआयने या मसुद्यावर १० डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.



bottom of page